तालुका

महाड नगरपालिकेला कुंभार आळी व तांबड भुवन मधील बंद पडलेल्या बोरिंग दुरुस्ती साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आले निवेदन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाड शहर उपाध्यक्ष दिपक चव्हाण यांनी दिले निवेदन

 

सचिन चांदोरकर – तालुका प्रतिनिधी महाड 

महाड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मनसेचे महाड शहर उपाध्यक्ष दिपक चव्हाण, पदाधिकारी आणि सदस्य यांनी महाड नगरपालिकेला कुंभार आळी व तांबड भुवन मधील बंद पडलेल्या बोरिंग दुरुस्त करून पूर्ण कामे करावीत याकरिता निवेदन देण्यात आले.

कारण महाड मधील छबीना उत्सव काही दिवसांवर आला आहे, यावेळी खूप दुरून व्यावसायिक आणि नागरिक येत असतात तरी कोणालाही पाणी टंचाई भासणार नाही याकरिता महाड नगरपालिकेने कुंभार आळी व तांबड भुवन मधील बंद पडलेल्या बोरिंग दुरुस्त करून पूर्ण कामे करावीत ही मागणी आहे.

यावेळी मनसेचे महाड शहर उपाध्यक्ष दिपक चव्हाण, पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!