तालुका
एस टी बसेसच्या लाइट्स, इंडिकेटर्स आणि वायपार तातडीने दुरूस्त करण्याची मनसेची मागणी
मुरुड डेपो अधिकारी वाघचावरे यांच्याकडे दिला मागणी पत्र
शरद चाफेकर – ग्रामीण प्रतिनिधी मुरुड – जंजिरा
मुरुड : एस. टी बसेसच्या लाइट्स, इंडिकेटर्स आणि वायपार तातडीने दुरूस्त करण्याची मनसेच्या कार्यकर्त्यांनी व अधिकाऱ्यांनी केलीडेपो अधिकारी वाघचावरे यांच्याजवळ पत्र व्यावहार केला.
प्रवाशांचा जीव धोक्यात घालू नका अशी मागणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी व अधिकाऱ्यांनी केली, यावेळी हा विषय येत्या ८ ते १०दिवसात विषय मार्गी लावू असे आश्वासन त्यानी मनसे पदधिकाऱ्यांना दिले आहे.
यावेळी शहर अध्यक्ष जागन पुलेकर, उपाध्यक्ष प्रवेश पालशेतकर, मनविसे तालुका अध्यक्ष युवराज भगत, उपाध्यक्ष अंकित गुरव, मनविसे मुरुड शहर उपाध्यक्ष प्रवेश पुलेकर, विभाग अध्यक्ष केतन चाफेकर, वैभव खोत उपस्थित होते.



