तालुका
तेलवडे येथे देवी दुर्गेच्या मूर्तीचे वाजतगाजत विसर्जन
शरद चाफेकर - ग्रामीण प्रतिनिधी मुरुड - जंजिरा
मुरुड : नवरात्री मध्ये नऊ दिवसांत सर्वत्र जल्लोष पाहायला मिळतो आणि देवीच्या प्रत्येक मंदिरात भाविकांची गर्दी असते. 26 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, देवी दुर्गेच्या मूर्तीचे थाटामाटात वाजतगाजत स्वागत करण्यात आले, मात्र आज 5 ऑक्टोबर 2022 रोजी दशमी तिथीला देवी दुर्गेच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. नवरात्रीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, देवीचा प्रसाद देखील ठेवण्यात येतो.
मुरुड – जंजिरा मधील ग्रामस्थ मंडळ तेलवडे देवी दुर्गा मातेचा विसर्जन वाजतगाजत आनंदाने विसर्जन सोहळा पार पडला. यावेळी पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.



