तालुका
मौजे बागमांडला राममंदीर सभामंडप, ग्रामपंचायत इमारतीचे, स्ट्रिट लाईट, मुख्य रस्ता ते वावेलवाडी रस्त्याच्या कामाचे भुमीपूजन
मौजे बागमांडला गावातील अनेक कामाचे भुमीपूजन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते
जितेंद्र माळी – तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन
श्रीवर्धन तालुक्यातील मौजे बागमांडला ग्रामपंचायत हद्दीतील राम मंदीरासमोर सभामंडपाच्या कामाचे भुमीपूजन, बागमांडला ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरण इमारतीचे भुमीपूजन, बंदर रोड येथील स्ट्रिट लाईट बसविणे तसेच बागमांडला–दांडा येथील मुख्यरस्ता ते वावेलवाडी गावापर्यंत रस्त्याच्या कामाचे भुमीपूजन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ग्रामस्थ समवेत संवाद साधला.
यावेळी जि.प. सदस्या सौ. प्रगती अदावडे, तालुकाध्यक्ष दर्शन विचारे, हिदायत भाई कुदरते, पं.स. सदस्य मंगेश कोमनाक, सौ. अनघा भाटकर, ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, मुंबई मंडळ आदि उपस्थित होते.



