राजकिय

पोलादपूर तालुक्यातील किनेश्वर वाडीचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

विनोद कासारे – शहर प्रतिनिधी महाड

पोलादपूर तालुक्यातील किनेश्वर वाडीतील पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला यांनी माणगाव – महाड – पोलादपूर आमदार भरतशेठ गोगावले आणि शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.

यावेळी शिवसेनेत पक्ष प्रवेश करणाऱ्या ग्रामस्थांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, आम्ही काँग्रेस पक्षात राहून देखील आपण पक्षपात न करता आमची विकास कामे मार्गी लावली, आपल्यासारखे आमदार या मतदार संघाला लाभले हे आमचे भाग्यच, आपण दिलेला शब्द पूर्ण केलात, म्हणूनच आम्ही शिवसेनेत प्रवेश करत आहोत, आपण दिलेला शब्द पूर्ण केलात, शिवसेना वचनास कटिबद्ध आहे त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत, शिवसेना करत असलेल्या विकास कामांवर विश्वास ठेवून आम्ही शिवसेनेत प्रवेश करत आहोत असे सांगितले.

या वेळी प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला व ग्रामस्थांना शिवसेना पक्षात कोणताही भेदभाव न करता सन्मानाची वागणूक दिली जाईल असे आमदार भरतशेठ गोगावले यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!