जिल्हा

आर्थिक आणि डिजिटल साक्षरता अभियान सन २०२३ २०२४ राजीवली येथे संपन्न 

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजिन 

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड

महाड : 24 नोव्हेंबर 2023 रोजी महाड तालुक्यातील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक शाखा विन्हेरे विस्तारीत कक्ष नागाव शाखेच्या वतीने राजीवली महाड येथे नाबार्ड अंतर्गत ग्रामीण भागातील बचतगटातील महिला व शेतकरी यांच्या करिता आर्थिक आणि डिजिटल साक्षरता अभियान कार्यक्रम घेण्यात आले होते.

यावेळी उपस्थित महिलाना बँकेचे शाखाधिकारी नितिन चांदोरकर यांनी बँकेच्या विविध योजनाची माहिती दिली तसेच बचत गटाच्या महिलाना कर्ज देण्यात असल्याची माहिती त्यांनी महिलांना दिली, बचत गटाच्या माध्यमातून महिलाना सक्षम करण्यासाठी विविध व्यवसायासाठी कर्ज देण्यात येईल असे सांगण्यात आले.

तसेच शेतकऱ्यांना देखील शेती विषयी लागणाऱ्या कर्जाची माहिती देण्यात आली, पंतप्रधान जीवन ज्योति योजना, पंतप्रधान विमा सुरक्षा योजना, पीएम किसान योजने अंतर्गत लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना केसीसी कर्ज वाटप योजनांची माहिती उपस्थित सर्व शेतकऱ्यांना देण्यात आली. आपल्या भागात बँक आल्याने ग्राहकांनी महिला वर्ग व शेतकरी वनि योग्य तो लाभ घेऊन बँकेला सहकार्य करून स्वतःचा उत्कर्ष करून घ्यावा. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दिनेश सुतार व आभार प्रदर्शनमहेश तटकरे यांनी मानले.

या वेळी बँकेचे शाखाधिकारी नितिन चांदोरकर, कॅशियर चंद्रकांत मेंगाळ, गावातील ग्राम पंचायत सरपंच मधुकर कालू जाधव, उपसरपंच दिनेश सुतार, गाव सचिव महेश तटकरे, माजी सरपंच विकास जगदाळे, गाव अध्यक्ष तुकाराम शिंदे, महिला प्रतीनिधी अनीता शिंदे, तंटा मुक्ति आध्यक्ष सुदाम सकपाळ, शाळा अध्यक्षा गंगाधर जंगम, महिला व शेतकरी वर्ग ई मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!