ब्रेकिंग

महाड मधील मौजे अदिस्ते रस्त्यालगत महिलेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळला; महिलेचा बलात्कार करुन हत्या

आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

 

प्रसारमाध्यम प्रतिनिधींना यांना घटनास्थळी जाण्यापासून रोखण्यात आले

सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक

महाड तालुक्यातील आदिस्ते ग्रामपंचायतीच्या सरपंच मीनाक्षी मनोहर खिडबिडे वय वर्ष ४८ यांचा मृतदेह तुडील भेलोशी रस्त्यापासून आत जाणाऱ्या आदिस्ते उबट आळी रस्त्यावर आढळून आला. तिच्या डोक्यावर वार करुन तिची हत्या करण्यात आली आहे . मृतदेह विवस्त्रावस्थेत असल्यामुळे तिच्यावर अत्याचार झाला असावा, अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मीनाक्षी खिडबिडे या सोमवारी दि . २७ दुपारी बारा साडेबारा वाजण्याच्या सुमारास चुलीसाठी लाकडे आणण्यासाठी गावालगत गेल्या होत्या.

दुपारी एक वाजण्याच्या सुमारास याच गावातील गणेश खिडबिडे हा या भागात बकऱ्या घेऊन गेला असता त्याला गोळा केलेली लाकडे दिसली पण जवळपास कुणी दिसले नाही, म्हणून त्याने शोध घेतला असता मीनाक्षी खिडबिडे यांचा विवस्त्रावस्थेतील मृतदेह त्याला दिसला.
त्याने पोलीस पाटलांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी पुढील तपास करण्यात आला.

आदिस्ते ग्राम पंचायतीच्या सरपंच मीनाक्षी मनोहर खिडबिडे यांच्या हत्येनंतर पालकमंत्री अदिती तटकरे या विधानभवनातून तातडीने महाड कडे रवाना झाल्या, त्याचप्रमाणे या हत्येने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तसेच मीनाक्षी खिडबिडे यांचे पुत्र सचिन यांनी आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पोलिसांकडे केली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

आदिस्ते ग्रामपंचायतीच्या सरपंच असलेल्या मीनाक्षी खिडबिडे यांचे पती याच खैरे पाणी पुरवठा योजनेचे पाणी सोडण्याचे काम करतात. २ जानेवारीला त्यांच्या मुलाचे ( सचिन ) लग्न होते, लग्न काही दिवसांवर आलेले असतानाच ही घटना घडल्याने या परिसरात शोककळा पसरली आहे.

महाडमधील प्रसारमाध्यम प्रतिनिधींना यांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. मात्र त्यांना प्रत्यक्ष घटनास्थळी जाण्यापासून रोखण्यात आले, त्यामुळे घटनेची कोणतीही अधिकृत माहिती देखील पोलिसांकडून देण्यात आली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!