राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतोय! मंगळवारी 2172 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधितांची नोंद नाही
सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसें दिवस वाढ पाहायला मिळत आहे. राज्यात आज 2172 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1098 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील दोन– तीन दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येतआहे. आज रुगणसंख्येने दोन हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे. त्यातच नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात आतापर्यंत 65 लाख 4 हजार 831 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.65 टक्के आहे.
राज्यात आज एकाही ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. आतापर्यंत 167 ओमायक्रॉन बाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 91 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
