तालुका

महाड मध्ये पूर परिस्थिती आढावा बैठक संपन्न


सचिन
चांदोरकर – ग्रामीण प्रतिनिधी महाड

13 जून 2022 रोजी सायंकाळी प्रांताधिकारी पुदलवाड मॅडम, महाडचे तहसीलदार काशीद, महाड शहराचे मुख्याधिकारी रोकडे यांच्या उपस्थितीमध्ये महाडमधील व्यापारी आणि संबंधित सामाजिक संस्थाना पूर संबंधात उपाय योजना आणि पुरानंतर घेण्यासाठी लागणारी आवश्यकता या संदर्भामध्ये शासनाने पूर काळात घेण्यात येणाऱ्या योजनांचा आज खुलासा केला, या बैठकीमध्ये महाड शहर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजय  मेहता, ज्येष्ठ व्यापारी प्रकाश भाई मेहता, पप्पू शेठ मुंदडा, कन्फेशनरी फेडरेशनचे अध्यक्ष प्रमोद पारेख, व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष महेंद्र शेठ पाटेकर, प्रदीप वडके ,मोबाईल असोसिएशनचे माजी अध्यक्ष सचिन चांदोरकर, दूध व्यवसायिक अध्यक्ष संदेश शेठ शिंदे, झेरॉक्स असोसिएशन प्रतिनिधी समीर देसाई, एम एम एस उपाध्यक्ष अशोक तलाठी, एमएच ए मॅनेजर काळे, एम एम ए निखिल भोसले आणि प्रतिष्ठित व्यापारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

पूर परिस्थितीमध्ये नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी शासनाने घेतलेल्या विविध संभाव्य गोष्टींचा मागोसा आणि सूचना देण्यात आल्या, योजनांमध्ये प्रामुख्याने महाड शहरात पाणी भरत असल्यास भोंगा वाजउन नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येईल, पाण्याची पातळी वाढल्यास व शहरात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास तालुका पातळीवर आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे, शोध व बचाव गट तयार करण्यात आला आहे, पाण्यात अडकलेल्या गरजू नागरिकाला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी नगरपालिका मार्फत 5 बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे, अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास सी आर पी एफ ची N D R F तुकडी जिल्हाधिकारी यांचेमार्फत बोलविण्याची तजवीज करण्यात आली आहे, राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळल्यास उपअभियंता राष्ट्रीय महामार्ग यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येतात, तहसील कार्यालय व नगरपालिका येथे 24 तास नियंत्रण कक्ष दि. 1 जून पासून चालू करण्यात आला आहे, महाड शहरात व ग्रामीण भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास निवारा केंद्रांमध्ये नागरिकांना स्थलांतरित करण्याची तजवीज ठेवली आहे.

पूरपरिस्थिती मध्ये प्रांताधिकारी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे महाड व्यापारी असोसिएशन तर्फे आभार मानण्यात आले.

प्रांताधिकारी पुदलवाड मॅडम, महाडचे तहसीलदार काशीद साहेब तसेच सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांचे आणि प्रशासनाचे महाड व्यापारी वर्गाने अनेक धन्यवाद दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!