तालुका
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा रोहा येथे संपन्न
संजय पाटील – तालुका प्रतिनिधी रोहा
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त या आर्थिक वर्षातील पहिला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा दि. 07 जून रोजी रोहा एमआयडीसी मधील रोहा इंडस्ट्रीज असोसिएशन हॉल येथे पार पडला.
या मेळाव्यासाठी रोहा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष डी. जी. नांदगावकर हे प्रमुख पाहुणे म्हणून तर रोहा, पुणे, तळोजा येथील एकूण 09 उद्योजक व त्यांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती, या रोजगार मेळाव्यात 249 उमेदवारांनी आपला सहभाग नोंदविला. यापैकी 94 उमेदवारांची प्राथमिक यादीत निवड झाली तर 10 उमेदवारांची निवड अंतिम यादीत करण्यात आली. या मेळाव्यास रोजगार इच्छुक उमेदवारांचा तसेच उद्योजकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.



