गोठे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते
सचिन चांदोरकर – तालुका प्रतिनिधी महाड
महाड : 12 मार्च रोजी गोठे येथील जलजीवन मिशन योजने अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. महाड तालुका विन्हेरे जिल्हा परिषद गणातील गोठे ग्रामपंचायत मधील मंजूर करून आणण्यात आलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ या विभागातील पदाधिकारी लोकप्रतिनिधी ग्रामस्थ मुंबईकर मंडळ यांच्या उपस्थितीत सदर कामाचा शुभारंभ करण्यात आला.
ग्रामस्थ, महिला भगिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की ग्रामपंचायत आपली असो किंवा नसो पण या ग्रामपंचायतीमधील जनता महिला भगिनी आपले आहेत, आम्ही पाण्यामध्ये राजकारण कधीही करत नाही, त्यामुळे या गावाची पाण्याची अडचण कायमस्वरूपाची आपण या योजने अंतर्गत दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, बाकी तुम्ही ठरवायचे आहे आपली विकास कामे कोण करत आहे आणि कोण नाही, विकास कामे करणाऱ्या सोबत राहायचे की फुकटची येऊन आश्वासने देऊन जाणाऱ्या सोबत राहायचे असे आमदार गोगावले यांनी सांगितले. यावेळी गोठे ग्रामस्थांच्या वतीने आणि महिला भगिनींच्या वतीने सदर पाणी योजना गावात राबविण्याचा संकल्प कोणताही दुजाभाव न दाखवता केल्याबद्दल खूप खूप आभार मानले.
यावेळी गोठे गावातील ग्रामस्थ, शिवसेनाचे आजी माझी पदाधिकारी, महिला व इतर सदस्य उपस्थित होते.



