दासगाव आणि वहूर ग्रामपंचायत सरपंच तपस्या जंगम आणि सौ. पारधी यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांची घेतली भेट
ग्रामपंचायत मधील विकास कामासंदर्भात मागणी करत दिले निवेदन
सचिन चांदोरकर – तालुका प्रतिनिधी महाड
महाड : दासगाव काँग्रेस पक्षाच्या सरपंच तपस्या महेंद्र जंगम आणि वहूर ग्रामपंचायत सरपंच सौ. पारधी यांनी ग्रामपंचायत मधील विविध विकासकामा निमित्त आमदार भरतशेठ गोगावले यांची त्यांच्या शिवनेरी ढालकाठी या निवास्थानी स्थानिक शिवसैनिक, पदाधिकारी आणि ग्रामपंचायत मधील सदस्यांसह एकत्र येऊन सदिच्छ भेट घेतली.
त्यावेळी ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच यांनी पुष्प गुच्छ देऊन आमदार भरतशेठ गोगावले शुभेच्छा दिल्या, यावेळी आमदार गोगावले यांनी त्यांच्या मागणीची दखल घेत आतापर्यंत या दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये आपणच विकास कामे केलेली आहे, तसेच दासगाव येथील तलाव सुशोभीकरणाचे काम देखील लवकरच सुरू करण्यात येणार आहे त्याला देखील मंजुरी मिळालेली असून दासगाव आणि वहूर या दोन्ही ग्रामपंचायती करिता जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मंजूर झालेला असून या योजनेकरिता वाढीव निधीची तरतूद लवकरच मंजूर करून आणण्यात येईल तसेच या पुढील जी काही उर्वरित विकास कामे आहेत ती करून देण्याचे आश्वासन आमदार गोगावले यांनी दिले.



