जिल्हा

मकर संक्रांत पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा करावा –जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले

 

राकेश देशमुख – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत नागरिकांनी“मकर संक्रांती-भोगी” या सणाचा दिवस दरवर्षी “पौष्टिक तृणधान्य दिन” म्हणून साजरा करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2023 हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केले आहे. त्याअनुषंगाने कृषी विभागामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातूनन कृषी विभाग सर्वसामान्य लोकांपर्यंत पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व, त्याचे फायदे काय आहेत, या बरोबरच तृणधान्य पिकांचे क्षेत्र,उत्पादन व उत्पादकता वाढ कार्यक्रम हाती घेणार आहे.

या दिनाचे औचित्य साधून प्रत्येक कृषी सहाय्यक आपल्याकडील गावांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्राचे आयोजन, तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांचे लागवड तंत्रज्ञान, तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, मुलाखती, तृणधान्य पिकांपासून बनवण्यात येणारे विविध उपपदार्थ यांची माहिती देणे, यासाठी प्रगतीशील शेतकरी,आहार तज्ञ, विद्यापीठांचे शास्त्रज्ञ यांना निमंत्रित करून कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!