तालुका
नांदगाव खुर्द मधील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड : महाड विधानसभा मतदारसंघ नाते विभागातील नांदगाव खुर्द मधील उबाठा गटातील कार्यकर्ते यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.
रुपेश मोरे, हर्षदा रुपेश मोरे, रमेश शेलार, शैलेश शेलार, अनिल डांगे, दत्ताराम डांगे, सचिन कदम, दिनेश गुडेकर, संतोष मांडवकर इत्यादींनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.
या पक्षप्रवेशामुळे नांदगाव खुर्द ग्रामपंचायत मध्ये शिवसेनेचा सरपंच बहुमताने निवडून येण्यास मदत होणार आहे, यावेळी प्रवेश कर्त्यांचे भगव्या पताका घालून शिवसेना पक्षात स्वागत करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख विजय आप्पा सावंत, तालुकाप्रमुख सुरेश महाडिक, युवा सेनेचे पप्प्या आंबवले, मयूर महाडिक, पार्टी दादा तसेच या भागातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते.



