जिल्हा
निजामपूर विभागातील कार्यकर्त्यांचा आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
निजामपूर: निजामपूर विभागातील चाच गावातील उबाठा गटाचे शाखाप्रमुख मंगेश नारायण मोरे यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते दत्ताराम भद्रिके, संदिप जोरकर, सहादेव पानवकर, दिनेश ठुळे,निशा ठुळे यांच्या सह अनेक कार्यकर्ते यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
या वेळी जिल्हाप्रमुख प्रमोदशेठ घोसाळकर, अरुण चालके, गणेश देवघरे, दिपक शेडगे, राजाराम शेडगे, जनार्दन दादा मोरे, राजाभाऊ रणपिसे, बाळाराम दबडे, दाजी कदम, युवासेना रायगड जिल्हा प्रमुख विपूल उभारे यांच्या सह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.



