मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्याच्या ऑपरेशन करिता दिले रोख ६ लाख ७५ हजार रूपये
तरुणांच्या वडिलांनी आमदार भरतशेठ गोगावले यांचे मानले विशेष आभार
सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक
माणगाव : शिवतेज कमलेश पवार वय वर्ष 13 राहणार लोणेरे येथील खडकोली गावामध्ये या तरुणाला कानाने ऐकू येत नव्हते, त्यामध्ये तो खूपच हुशार वडिलांनी ग्रामीण रुग्णालय येथे चौकशी देखील केली पण त्यांनी सांगितले शहरामध्ये न्यावे लागेल त्यासाठी खूप खर्च होईल ऑपरेशन करावे लागेल, चांगल्या डॉक्टर कडे चौकशी केली असता समजले की ऑपरेशन साठी ६ लाख ७५ हजार रुपये एवढा खर्च येईल, हा आकडा ऐकल्यावर धक्का बसला, एवढे पैसे कसे जमा करावे यासाठी सर्व कुटुंबियांनी प्रयत्न केले, पण घरची परिस्थिती खूपच हालाकीची मग या तरुणांच्या कुटुंबियांनी जेव्हा आमदार भरतशेठ गोगावले यांच्याकडे संपर्क साधला तेव्हा ते स्वतः या तरुणांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर घेऊन गेले आणि ही परिस्थिती त्यांच्या कानावर घातली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळेस ताबडतोब साडेसहा लाख रुपये रोख आमदार भरतशेठ गोगावले यांच्याकडे सुपूर्द केली, सदर ही रोख रक्कम शिवतेज याचे वडील कमलेश पवार यांच्याकडे आमदार भरतशेठ गोगावले यांनी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मुलाच्या ऑपरेशन करिता सुपूर्द केली.
या तरुणांच्या वडिलांनी कमलेश पवार यांनी आमदार भरतशेठ गोगावले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानले आणि म्हणाले की आमचा संपूर्ण परिवार हा तुमचे आयुष्यभर उपकार विसरणार नाही, खरोखरच आमदार भरतशेठ गोगावले हे देव माणूस आहेत, आम्ही फक्त ऐकले होते आणि आज प्रत्येक्षात माणसामधील देव पहिला, खरोखरच मी ऋणी आहे.
यावेळी अरुण चाळके, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, महिला जिल्हा संघटक नीलिमाताई घोसाळकर, युवा अधिकारी विपुल उभारे, प्रसाद गुरव, विभाग प्रमुख रवी टेंबे, पंचायत समिती सदस्य महेंद्र तेडगुरे, तालुका महिला संघटिका अरुणा वाघमारे, शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते.



