ब्रेकिंग

पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज कायम, विदर्भासह मराठवाड्यात जोरदार पाऊस 

 

दशरत थोरवे – जिल्हा प्रतिनिधी सोलापूर 

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे सध्या राज्यासह देशात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला असून पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता कायम आहे. विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. देशासह महाराष्ट्रातील अनेक भागात सोमवारी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला आहे.

गारपीट आणि अवकाळी पावसाच्या दृष्टीने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे. आवश्यक असूनही चुकून सुद्धा झाडा खाली उभे राहू नये. जिल्ह्यातील समस्त नागरिकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करावे व स्वसंरक्षणासाठी सतर्क राहावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!