ब्रेकिंग

राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणून शरद पवार यांना हटवत अजित पवारांकडून स्वतःची अध्यक्ष म्हणून नियुक्ती

सर्व मताने ठराव झाल्याचे पत्र आयोगात

 

संदेश चौधरी – संपादक कोकण विभाग 

अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत अशा आशयाचा ठराव मंजूर करण्यात आला असून तसं पत्र निवडणूक आयोगामध्ये दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रीय अध्यक्ष पदावरुन शरद पवारांना हटवत अजित पवार यांनी निवड केल्याच्या आशयाचा ठराव पक्षाच्या आमदारांनी एकमताने मंजूर केल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे आता संपूर्ण राष्ट्रवादीवर दावा करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्यावर आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 30 जून रोजीचे राष्ट्रवादीच्या 40 आमदारांच्या सह्यांचे पत्रदेखील अजित पवार यांनी 5 जुलैला म्हणजे आज दाखल केल्याची माहिती आहे. त्यामध्ये पक्षावर दावा करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!