ठेका कामगारांच्या हक्कांसाठी विरार मध्ये सर्व पक्षीय मोर्चा
वसई विरार महानगरपालिका अंतर्गत ठेका कामारांवर होणाऱ्या अन्याय बाबत
भरत पवार – शहर प्रतिनिधी नालासोपारा
विरार : 03 जुलै रोजी सकाळी 11 वाजता विरार पश्चिम येथे ठेका कामगारांच्या हक्कांसाठी सर्व पक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले. हा मोर्चा वसई विरार महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या ठेका कामारांवर होणाऱ्या अन्याय बाबत वाचा फोडण्यासाठी व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी होता.
हा मोर्चा विरार पश्चिम म्हाडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ते स्टेशन परिसरातून विरार पूर्वेला मुख्यकार्यालय पर्यंत होता.
या मोर्चाचे महत्वाचे मुद्दे – स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून देणे, शासनाच्या निर्णयामुळे कामगारांच्या नोकरी वर आलेल्या अडचणी संपवणे आणि गेली अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांना अचानक काढून नवीन भरती प्रकिया.
यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर, आमदार राजेश पाटील, स्थानिक कामगार संघाचे नेता राजीव पाटील, स्थानिक कामगार संघाचे समन्वयक हार्दिक राऊत, राष्ट्रवादी जनरल संघटनेचे राजाराम मुळीक, मनसे कामगार सेने तर्फे प्रफुल पाटील, भाजपा तर्फे राजन नाईक, शिवसेने तर्फे शिरीष चव्हाण, सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



