शहर

महाड शहरात पोलिसांचा रुट मार्च

सचिन चांदोरकर – उपशहर प्रतिनिधी महाड

महाड दि.26 नवरात्रौत्सवात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, नागरिकामध्ये कायदा आणि पोलीस यांचा धाक रहावाया उद्देशाने महाड शहरात आज दंगा काबू सराव घेण्यात आला. त्याच प्रमाणे पोलिसांची सज्जता दाखविण्यासाठी शहरात रुट मार्च देखील काढण्यात आला.

           उपविभागिय पोलीस अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सराव घेण्यात आला. यात महाड उपविभागातील पाचपोलीस अधिकारी, २५ अंमलदार आणि आरसीपीची एक प्लाटून सहभागत झाली होती. मुख्यालयातील कवायत प्रशिक्षकांनी हा सराव करुन घेतला.

         क्रांतीस्तंभा समोरील चौकात दंगा सकाळी पावणेआठ वाजता सराव घेण्यात आला. त्यानंतर शहरातून रुट मार्च काढण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!