जिल्हा

मुरुड – जंजिरा समुद्र किनाऱ्यावर जोरदार बैलगाडी शर्यत संपन्न / बैलगाडी शर्यतीला उदंड प्रतिसाद

बैलगाडी शर्यत आमदार महेद्रशेठ दळवी यांच्या उपस्थितीत पडली पार

 

शरद चाफेकर – ग्रामीण प्रतिनिधी मुरुड जंजिरा 

मुरुड – जंजिरा: मुरुड – जंजिरा समुद्र किनाऱ्यावर नुकतीच बैलगाडी शर्यत आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या उपस्थितीत पार पडली. बैलगाडा शर्यत शौकीनांनी ही शर्यत पाहायला प्रचंड गर्दी केली होती. इतर शहर आणि तालुक्यातील शर्यतीसाठी बैलगाडा मालक आणि शौकिनांनी या शर्यतीला आपली उपस्थिती लावली होती.

मुरुड – जंजिरा समुद्र किनाऱ्यावर या शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते, मुरुड बैलगाडी कमेटी अध्यक्ष विनायक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रथम क्र. कमाने बंधू बोली मांडला, दृतीय क्र. अक्षय जाधव मुसेद आणि तृतीय क्र. सुजीत कासार काशिद यांनी पटकवला असून मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले.

या वेळी बैलगाडी कमेटी अधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!