तालुका

जैन समाज संकेत ग्रुप गोरेगाव, मुंबई यांच्या मार्फत चरई रा. जि. प. शाळांकरिता शाळेय वस्तूंचे वाटप

सुरज पुरारकर – तालुका प्रतिनिधी तळा

दि. 30 जानेवारी रोजी जैन समाज संकेत ग्रुप गोरेगाव मुंबई अतुलभाई शहा आणि भरत आदाने यांच्या मार्फत कृष्णा महाडिक यांच्या सहकार्यातून चरई गवळवाडी आणि आदिवासी वाडी येथे शंभर कुटुंबांना धान्य वाटप तसेच प्रत्येकी शंभर रुपये तर 25 कुटुंबांना ब्लॅंकेटव धान्य वाटप तसेच 8 विधवा निराधार महिलांना धान्य व ब्लँकेट व प्रत्येकी हजार रूपये वाटप करण्यात आले.

अतुल शहा यांनी रा. जि .प. शाळा चराई गवळवाडी, आदिवासी वाडी येथील मुलांना शैक्षणिक साहित्य खेळणी व रंगीत कपडे वाटप करण्यात आले.

केलेल्या मदती मुले चरई गवळवाडी व आदिवासी वाडी ग्रामस्थ, महिला मंडळ व शाळेच्या वतीने आभार मानले, यावेळी अतुल भाईशहा, भरत आदाने, कृष्णा महाडिक, हायस्कूलचे मुख्याध्यापक दुधाळ सर, लाड सर, रा. जि. प. शाळा मुख्याध्यापक कल्याणी वाजेमॅडम, ढोले सर, अंगणवाडी सेविका पवार मॅडम, व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय हिलम, गाव अध्यक्ष गणपत कोळी, उपाध्यक्ष श्रावण जाधव, गावातील शिक्षित तरुण चंद्रकांत हीलम व सर्व ग्रामस्थ व महिला मंडळ शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!