आरोग्य व शिक्षण

गोरेगाव मधील सर्पमित्राने दिले अजगराला जिवदान

राजेंद्र गवसकर – तालुका प्रतिनिधी माणगाव

३० जानेवारी रोजी रात्री १२ च्या सुमारास गोरेगांव येथील विष्णू तलावा जवळ एक अजगर आढळा, अजगर म्हणजेच इंडियन रॉक पायथन हा एक निशाचर साप असून बिनविषारी प्रकारात मोडतो तसेच त्याची गणती धोक्यात असलेल्या जातींमध्ये होते. अशा अजगराचे दर्शन तसे दुर्मिळच, तो 6 फूट लांब व 5 ते 6 किलो वजनाचा असून हा अजगर तलावाकाठील रस्त्यावरून नजीकच्या घराकडे चालला असताना रात्रीच्या सुमारास परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गोरेगावातील विष्णू तलावा जवळ राहणारे सर्पमित्र जिज्ञेश दोशी व त्यांचे बंधू जितेश दोशी यानी काळजीपूर्वक अजगराला पकडून आपल्या ताब्यात घेतले जेणे करून अजगराला आणि आसपासच्या रहिवाश्याना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. दुसऱ्या दिवशी ३१ जानेवारीच्या सकाळी वन खात्याचे अधिकारी आदिनाथ कंठाळे आणि विशाल जाधव यांच्या उपस्थितीत दोशी बंधूनी अजगराला त्याच्या निवास्थानात – म्हणजेच गोरेगांव शहराबाहेरील जंगलात  सुखरूप मोकळे सोडले. निसर्गाचे आणि त्यातील जाती–प्रजातींचे संवर्धन व संरक्षण करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे असे मानणाऱ्या जिज्ञेश व जितेश दोशी यांनी प्रसंगावधान राखून अजगराला नवीन जीवदान दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!