महाडमध्ये उद्धव ठाकरें यांची विराट सभा
शिवसेना संपवली पाहिजे यासाठी काहींनी प्रयत्न केले. पण ज्यांनी शिवसेना वाढवली ते माझ्यासोबत आहे: उद्धव ठाकरे
भाजपने नीच डाव साधत पक्षाचं नाव, निवडणूक चिन्हं गद्दारांना दिले – उद्धव ठाकरे
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड: शिवसेना संपवली पाहिजे यासाठी काहींनी प्रयत्न केले. पण ज्यांनी शिवसेना वाढवली ते माझ्यासोबत आहेत. माझ्यावर टीका केल्याशिवाय काहींना भाकरीदेखील मिळत नसेल अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
भाजपने नीच डाव साधत पक्षाचं नाव, निवडणूक चिन्हं गद्दारांना दिले; उद्धव ठाकरे यांचे टीकास्त्र
सत्ता असते त्या ठिकाणी लोक जातात. आज माझ्याकडे सत्तादेखील नाही. भाजपने नीच डाव साधत पक्षाचं नाव, निवडणूक चिन्हं त्यांना दिले. माझ्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाशिवाय काहीच नाही. तरीदेखील अनेकजण पक्षात येत आहेत…याचं आश्चर्य वाटत आहे.
बारसूमध्ये सगळीकडे पोलीस, घरात पोलीस, गच्चीवर पोलीस, एवढा बंदोबस्त सीमेवर लावला असता तर चीन घुसला नसता – उद्धव ठाकरे
कोकणी बांधवाच्या मनाविरोधात प्रकल्प रेटवणार असाल तर संघर्ष करू, सगळा महाराष्ट्र बारसूमध्ये आणू: उद्धव यांचा इशारा
रायगडमधील पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त गावातील पुनर्वसनाचे काम प्रशासनाने थांबवले; उद्धव यांचा आरोप
कर्नाटकमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी बजरंगबलीच्या बलाची आवश्यकता भासते तर तुमचे बल गेलं कुठं? उद्धव यांचा भाजपवर हल्लाबोल
कोकणात मी माझ्या नातेवाईकांसाठी लढतोय…तुम्ही उपऱ्या लोकांसाठी लढताय; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिवसेना शिंदे गटावर टीकास्त्र



