तालुका

बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा संपन्न

लोकार्पण सोहळा आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभहस्ते संपन्न

स्वप्नील ढवण – उपसंपादक

ग्रामीण भागातील जनते च्या सेवे करिता शासनाकडून अद्ययावत अशा नवीन रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत, दिनांक 28 सप्टेंबर रोजी बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला, महाड – पोलादपूर – माणगाव चे लोकप्रिय आमदार माननीय श्री. भरतशेठ गोगावले यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून या रुग्णवाहिका चे उद्घाटन करण्यात आले, बिरवाडी रुग्णालयाचे डॉक्टर बिराजदार यांच्याकडे नवीन गाडी सुपूर्द करण्यात आली. 

यावेळी पंचायत समिती सभापती सपना मालुसरे, रा.जि. प. सदस्य मनोज काळीजकर, रा. जि. प. सदस्य संजय कचरे, पंचायत समिती मा. सभापती ममता गांगण, डॉ. बिरादार, नगरसेवक डॉ. चेतनजी सुर्वे, विभाग प्रमुख राजू देशमुख रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!