ब्रेकिंग

महाड तालुक्यात मोटर सायकल अपघातात एक ठार तर दोन जण गंभिर जखमी

मोटर सायकल स्लिप होऊन झाला अपघात, अपघाताचे दृष्य सीसीटीव्हीमध्ये कैद

स्वप्नील ढवण – उपसंपादक

बिरवाडी ढालकाठी मार्गावर दुचाकीचा अपघात होऊन त्यात एका मुलाचा मृत्यु झाला, तर दोन मुले गंभीर जखमी झाले आहेत. आज ( शनिवारी ) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ढालकाठी पुलानजिक हा अपघात झाला. शुभम रमाकांत झांजे वय १५ , रा . आकले असे मयत मुलाचे नाव असुन, विशाल यादव वय १६ आणि आदित्य घाडगे वय 16 हे दोघे गंभिर रित्या जखमी झाले आहेत. हे तीघेएकाच दुचाकीवरुन जात असताना ढालकाठी पुलानजिक ही दुचाकी घसरुन हा अपघात झाला. या अपघातात शुभम झांजे याचा डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. तर विशाल आणि आदित्य हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची नोंद एम आय डी सी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!