तालुका

महाड विधानसभा मतदार संघात कोट्यावधी रुपयांच्या मंजूर विकासकामांचा शुभारंभ आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभहस्ते

 

स्वप्नील ढवण – उपसंपादक

पन्हळघर बुद्रुक ६२ लक्ष १६ हजार नळपाणी पुरवठा योजना, आंबरले २ कोटी २५ लक्ष ९२ हजार रुपये तर वाघोसे ३४ लक्ष ७४ हजाररुपये नळपाणी पुरवठा योजने करिता मंजूर आमदार भरत शेठ गोगावले यांच्या प्रयत्नांना यश तसेच आंबरले बौद्धवाडी अंतर्गत रस्ता उद्घाटन सदर रस्त्या करिता करिता १० लक्ष रुपये

जल जीवन मिशन राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत महाड विधानसभा मतदार संघातील माणगाव तालुका लोणेरे विभाग अंबरले ग्रामपंचायत हद्दीमधील  नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ लोकप्रिय कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभहस्तेकरण्यात आला.

सदर योजने साठी आमदार भरतशेठ गोगावले यांनी मंत्रालयात संबंधित विभागाकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे सदर योजनामंजूर होऊन मार्गी लागल्याचे सांगितले.

या योजनेमुळे अंबरले गावातील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे असे देखील गोगावले म्हणाले,

सदर योजनेसाठी आमदार गोगावले यांनी केलेल्या प्रयत्नामुळे महिला भगिनींच्या डोक्‍यावरील हंडा खाली उतरणार आहे, या मुळेआमदार साहेबांचे आम्ही खूप खूप आभारी असल्याचे ग्रामस्थांच्या आणि महिला भगिनींच्या वतीने सांगण्यात आले, आमदार गोगावले साहेब दिलेला शब्द पूर्ण करतात म्हणूनच आम्ही त्यांना तीन तीन वेळा निवडून दिले आहे आणि यापुढे देखील त्यांच्या पाठीशी कायमच राहणार असल्याचे अंबरले ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले.

या कार्यक्रमासाठी तालुक्यातील आणि विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी नेते तसेच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सभापती विभाग प्रमुख शाखाप्रमुख आणि आजी माजी शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!