तालुका

औद्योगिक प्रशिक्षण संस्था तळा येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

मयूर पुरारकर तळा औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय येथे प्रथम

सुरज पूरारकर – तळा तालुका प्रतिनिधी

तळा: तळा तालुक्यात असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय या संस्थेत 2020 2022 या कालावधीमध्ये वायरमन या ट्रेडमध्ये वर्ष दोन करिता प्रवेश घेऊन अथक परिश्रम घेऊन गोरेगाव मधील मध्यमवर्गीय विद्यार्थी कु. मयूर सुरेश पुरारकर गोरेगाव चिंचवलीवाडी 2022 रोजी उरण येथे झालेल्या वायरमन ट्रेड या परीक्षेत 600 पैकी 532.2 तर 88%66 गुण मिळवून वायरमन ट्रेड मध्ये प्रथमतर पूर्ण औद्योगिक प्रशिक्षण संस्था तळे या संस्थेत प्रथम येऊन तळा आयटीआय चे नाव उंचावले आहे. सोबत तुषार मुंडे द्वितीय 600 पैकी 524 तर शुभम हरणेकर 600 पैकी 519 तृतीय असे भरगोस यश संपादन केले आहे.

        गेल्या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरावरून गुणवंत विद्याथ्यांवर कौतुकाचे वर्षाव होत आहे. उपस्थित सर्व शिक्षक व प्रमुख पाहुणे केदार सर, लोहार सर तसेच परब, व्यापारी सर, सौ. भट मॅडम, धुरी सर व बेलोसे सर तसेच सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था तळ्याचे विद्यार्थीयांच्या उपस्थितीत गुणगौरव सोहळा संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!