तालुका

सरेकर आळी सार्वजनिक मित्र मंडळाच्या गणेशोत्सवातील जिवंत देखाव्याला रोटरी क्लब तर्फे प्रथम क्रमांक

सचिन चांदोरकर – उपशहर प्रतिनिधी महाड

महाड दि. 13 गेली अनेक वर्षे सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये जिवंत देखावे सादर करून विविध विषयांवर प्रकाश झोत टाकीत समाजप्रबोधन करणार्‍या महाड मधील सरेकर आळी सार्वजनिक मित्र मंडळाच्या गणेशोत्सवातील मोबाईलचा अतिरेक या विषयावर सादर केलेल्या जिवंत देखाव्याला रोटरी क्लब महाडच्या वतीने प्रथम क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. गेली अनेक वर्षे सातत्याने हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जिल्हास्तरीय, तालुका स्तरीय व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आयोजित केल्या जाणार्‍या गणेशदर्शन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावित आहे. आपल्या प्रथम क्रमांक मिळवण्याची परंपरा या मंडळाने याही वर्षी कायम ठेवली आहे.

महाड मधील सरेकर आळी सार्वजनिक मित्रमंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा ४५ वे वर्ष आहे. यावर्षी मंडळाच्या वतीने मोबाईलच्या अति वापरामुळे भावी पिढीचे भवितव्य धोक्यात आल्याचे ” हे जीवन सुंदर आहे ” या आपल्या जिवंत देखाव्यातून दाखवत समाजाचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. या जिवंत देखाव्याची संकल्पना जयंत कदमआणि विजय साळुंखे यांची आहे.

  पब्जी सारखे खेळ खेळून काही मुले आपले जीवन उध्वस्त करून घेत आहेत तर मोबाईल न मिळाल्याने काही जण आत्महत्येचा प्रयत्न करीत आहेत हे आपल्या जिवंत देखाव्यातून दाखवून भावी पिढीच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम मंडळाने केले आहे. मोबाईलमुळे हे जग आणखीन जवळ आले आहे परंतु माणुस माणसापासून दुरावत चालला आहे. एका घरात राहणार्‍या आई वडीलमुला मुलींचे संवाद होईनासे झाले आहे त्यामुळे नात्यातील गोडवा हरवत चालला आहे. मोबाईलचा वापर कामापुरते करून नाती जपाअसा संदेश या मंडळाने आपल्या देखाव्यातून दिला आहे.

            गेली १६ वर्ष सतत जिवंत देखाव्यातून हे मंडळ समाज प्रबोधन करीत आहेत. त्यासाठी सरेकर आळीतील तरुण मुले मुली वछोटी मुले सतत १० दिवस तब्बल चार ते पाच तास आपला जिवंत देखावा उत्तम अभिनय करून सादर करीत असतात. यावर्षी हे जीवनसुंदर आहे या देखाव्यासाठी साहिल दुधगांवकर, श्रेयस यादव, साहिल धाडवे, अनघा दवंडे, प्रगती उमासरे, ओमकार वाघ, अथर्व भुवड, हितेन पाटेकर, राजवीर पाटेकर, स्मित पाटेकर , हर्ष कदम, पार्थ साळुंखे, रुद्र साळुंखे या कलाकारांनी भाग घेतला होता. त्यांच्या अभिनयाचे कौतुक महाड पोलादपूर माणगावचे आमदार भरतशेठ गोगावले, कॉंग्रेसचे नेते हनुमंत जगताप व अन्य राजकिय पक्षाच्या नेतेव पदाधिकार्‍यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!