जिल्हा

वरंधा घाट सध्या दि. ३० एप्रिल ते ८ मे 2024 पर्यंत वाहतुकीसाठी खुला

प्रवाशांच्या मागणीनुसार आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नाने पूर्ववत वाहतुकीसाठी सुरू

 

सतिश मेहता – तालुका प्रतिनिधी महाड 

महाड : वरंधा घाट सध्या दि. ३० एप्रिल ते ८ मे 2024 पर्यंत वाहतुकीसाठी प्रवाशांच्या मागणीनुसार आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नाने पूर्ववत वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.

देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी भोर महाड रस्ता दोन महीने बंद करण्यात आला होता.

राजेवाडी (ता. महाड) ते रायगड जिल्हा हद्द या रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम, संरक्षक भिंत बांधण्याची व आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यासाठीची कामे प्रगतिपथावर आहे. सद्यस्थितीत वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्दीमध्ये (भोर हद्दीपर्यंत) संरक्षक भिंतीचे काम प्रगतिपथावर असून बहुतांश काम पूर्ण झालेले आहे. परंतु पारमाची वाडी ते रायगड जिल्हा हद्द या लांबीमध्ये काम सुरू करावयाचे आहे. परंतु, या लांबीमध्ये खोल दरी व उंच डोंगर असून रस्त्याची रुंदी काम करावयास अपुरी आहे.

कोकणामध्ये सध्या लग्नसराई तसेच उन्हाळ्याची सुट्टी आणि निवडणुक पाहता कोकणात येणारे प्रवासी यांची हेळसांड होऊ नये तसेच या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी वेळोवेळी केलेल्या मागणीची दखल घेत संबंधित जिल्हाधिकारी आणि प्रशासनाशी चर्चा करून आमदार भरतशेठ गोगावले यांनी दि. ३० एप्रिल ते ८ में 2024 पर्यंत रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिल्याचे सांगितले आहे.

सदर रस्ता वाहतूकसाठी खुला करून दिल्याबद्दल आमदार भरतशेठ गोगावले यांचे प्रवासी वर्गाकडून आणि जनते कडून आभार व्यक्त होत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!