तालुका

सव येथील ऐतिहासिक गरम पाण्याच्या कुंडाची साफसफाई

कै. तात्याजी शिंदे प्रतिष्ठाण मार्फत कुंडाची साफसफाई

सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक

कै. तात्याजी शिंदे प्रतिष्ठाण उगवतीवाडी सव च्या संपूर्ण सभासदांकडून दिवाळी निमित्त एक समाजसेवा उपक्रम राबविण्यात आला ते म्हणजे महाड तालुक्यातील सव मधील ऐतिहासिक गरम पाण्याचे कुंड म्हणून प्रसिद्ध आहे, ह्या कुंडा मध्ये 12 हि महिने गरम पाणी असते, त्यामुळे हिते खूप पर्यटक येत असतात, या वर्षी 21 जुलै रोजी आलेल्या महाभयंकर महापूरामुळे येथील कुंडामध्ये दूषित पाणी वगाळ बसला होता,

तर त्याची साफसफाई होणे गरजेचे होते, नाहीतर त्या पाण्यामध्ये अंघोळ केल्यामुळे त्वचे वरील कोणतेही आजार होण्याची शक्यता होती, चार महिन्यांचा कालावधी उलटूनही प्रशासनाने कोणतीही पाहुले उचलली नव्हती, तरी गंभीर बाब लक्षात घेऊन दिवाळी निम्मित सुट्टी आल्यामुळे गावी आलेल्या कै. तात्याजी शिंदे प्रतिष्ठाण च्या तरुण मुलांनी आणि प्रतिष्ठाण मधील सर्व सभासदांनी एकत्र येऊन साफसाईचा हा उपक्रम राबविला, यासाठी संपून एक दिवस आधी लागणारे साधन सामग्री, वेळ, खर्च या सर्व बाबींचा विचार करून नियोजन करण्यात आले.

त्यानंतर कै. तात्याजी शिंदे प्रतिष्ठाण उगवतीवाडी सव च्या संपूर्ण सभासदांकडून एक छोटी समाजसेवा करण्यात आली. या उपक्रमासाठी संपूर्ण एक दिवस आणि रात्री पर्यंत काम करत होते, छोटे मोठे असे इकूण तीन कुंड आहेत,

महापूरामुळे गरम पाण्याच्या कुंडामध्ये खूप गाळ येऊन बसला होता, असे तिन्ही हि कुंडाची साफसफाई करून, कुंडाच्या बाजूचा संपूर्ण परिसरही साफ करून कुंडावरील भिंतीला रंगरंगोटी करण्यात आली, त्यांच्या या कामगिरीबद्दल संपूर्ण सभासदांचे गावामध्ये व इतर ठिकाणी कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!