ब्रेकिंग

आमदार भरतशेठ गोगावले मित्रमंडळाची ५१ हजाराची दहीहंडी 

५ ते ७ थर लावणार्‍या गोविंदा पथकांना आकर्षक बक्षिसे / वर्षभरात वेगवेगळ्या क्षेत्रा मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरिकांचा विशेष सन्मान

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

महाड दि. 5 आमदार भरतशेठ गोगावले मित्रमंडळाच्या वतीने यावर्षीही महाड शहरात दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून प्रथम क्रमांकासाठी ५१ हजाराचे भव्य पारितोषिक ठेवण्यात आले आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष राजू पावले आणि सेक्रेटरी अमित शेट्टी यांनी प्रस्तुत प्रतिनिधी सोबत बोलताना दिली.

गेल्या ५ ते ६ वर्षापासून आ. भरतशेठ गोगावले मित्रमंडळाची दहीहंडी ही महाडकरांचे विशेष आकर्षण ठरली असून महाड तालुक्यासह माणगांव, खेड, दापोली, मंडणगड तालुक्यातील गोविंदा पथक ही हंडी फोडण्यासाठी हजेरी लावत असून ७ व त्यापेक्षा जास्त थर लावण्याचा प्रयत्न करीत असल्याने येथील दहीहंडी फोडण्याचा थरार पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते.

आ. भरतशेठ गोगावले मित्रमंडळाचे वतीने यावर्षीही महाड शहरात प्रभात कॉलनी प्रभु लॉज समोर दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून सर्वात जास्त थर लावून मंडळाची हंडी फोडणार्‍या गोविंदा पथकास ५१ हजाराचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. याखेरीज ४ थर लावणार्‍या महिला गोविंदा पथकाला ७ हजार, 5 थर लावणाऱ्या महिला गोविंदा पथकास 11 हजार रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहे.

तसेच ५ थर लावणार्‍या पुरुष गोविंदा पथकाला ७ हजार, ६ थर लावणार्‍या गोविंदा पथकाला १२ हजार व ७ थर लावणार्‍या गोविंदा पथकाला २५ हजार आणि सन्मानचिन्ह अशी भरघोस बक्षीसे दिली जाणार आहेत.

दहिहंडी फोडणार्‍या गोविंदा पथकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आयोजकांतर्फे घेण्यात आली असून या दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धेत भाग घेणार्‍या गोविंदा पथकांना ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ नंतर प्रवेश दिला जाणार नाही असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

दहीहंडी उत्सवा दरम्यान गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या क्षेत्रा मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरिकांचा विशेष सन्मान भरत शेठ गोगावले मित्रमंडळाच्या वतीने केला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!