तालुका
मांडले बौद्धवाडीतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड : महाड विधानसभा मतदारसंघात आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली होत असलेली विकास कामे पाहून मांडले बौद्धवाडीतील उबाठा गटातील अक्षय साळवे, सागर साळवे, प्रेमरतन साळवे, सुधाकर साळवे, लक्ष्मण साळवे, रोहित साळवे, साहिल साळवे, उमेश साळवे, वैभव साळवे, तुषार पवार इत्यादींनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे, मांडले येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख सुरेश तांदळेकर, उपशाखाप्रमुख महेंद्र पोळेकर, चेतन मोरे, बळीराम तांदळेकर, बळीराम मोरे, विठोबा जगताप, गोठल आणि विभागातील शिवसेना युवासेनेचे आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते.



