ब्रेकिंग

शिवराज्याभिषेकदिन सजावटी दरम्यान कामगाराचा दुर्दैवी अपघाती मृत्यू

विजेचा शॉक लागल्याचा प्राथमिक अंदाज

 

सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक

रायगड : स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर दिनांक 2 जून ते 6 जून दरम्यान 350 वा शिवराज्याभिषेकदिन सोहळा पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर गडावरील कार्यक्रमाच्या आयोजनाचे व सजावटीचे काम सुरू असताना दिनांक 30 मे रोजी एका कामगाराचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

जमालुद्दीन तोहीन शेख वय 38 असे मयत पुरुषाचे नाव आहे. तो मूळचा बिहारचा असून सध्या धारावी मुंबई येथे वास्तव्यास होता. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर मयत व्यक्ती किल्ले रायगड येथे शिवराज्याभिषेकदिन सोहळ्याच्या सजावटीचे काम करीत असताना रात्री 11 चे सुमारास विजेचा शॉक लागल्याने त्याला तातडीने पाचाड ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढे उपचाराकरिता महाड ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सदर घटनेचा संपूर्ण तपास महाड तालुका पोलीस ठाण्यामार्फत सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!