तालुका
पोलादपूर तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी शिवसेनेत आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत केला पक्ष प्रवेश
समीर पवार – तालुका प्रतिनिधी पोलादपूर
पोलादपूर : दि. २८ मे रोजी भव्य पक्ष प्रवेश समारंभ पोलादपूर येथील मोरे हॉल मध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलादपूर वरचा मोहल्यातील मुस्लिम समाज बांधव, देवळे, तुंर्भे खोंडा, वझरवाडी, तुंर्भे, बु. लोहारे, चांभारगणी, कापडे बु.आदिवासी वाडी तसेच यांच्या समवेत तालुक्यातील विविध ग्रामपंचायत मधील असंख्य काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी पोलादपूर तालुक्यातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पक्षातील काम करणाऱ्या शिवसैनिकांना विविध भागात संघटनेची जबाबदारी देत जनतेचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी तसेच पक्ष बांधणीसाठी नियुक्तीपत्र देण्यात आले.



