आ. बबनदादा शिंदे यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त माढा तालुक्यात बेंबळे येथे विक्रमी २७२ जणांचे रक्तदान
अनिल अवताडे – तालुका प्रतिनिधी माढा
माढा : माढा तालुक्यामध्ये गेले दहा दिवस झाले मा. आ. बबन दादा शिंदे यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण माढा मतदार संघात गावागावांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. २९ ऑगस्ट रोजी मंगळवार बेंबळे येथे सिद्धेश्वर ग्रामविकास आघाडी (हुंबे पार्टी) बेंबळेचे पार्टीप्रमुख वि शिंदे सह. सा. का. संचालक विष्णुदादा हुंबे, मार्केट कमिटी संचालक दिलीपराव भोसले यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
या शिबिरास सो जि दूध संघ अध्यक्ष रणजितभैय्या शिंदे, सभापती विक्रम दादा शिंदे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बंडू नाना ढवळे, राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष रामभाऊ शिंदे, केन मॅनेजर संभाजी थिटे यांनी भेट दिली.
बेंबळे येथे झालेल्या शिबिरात माढा मतदारसंघ जे रक्तदान शिबिर झाले, त्यामध्ये मतदार संघातील सर्व गावांची विक्रमी मोडीत काढत २७२ रक्तदान बेंबळे येथे महिलांसह रक्तदात्यांनी देखील रक्तदान केले.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी माढा तालुका सामाजिक न्याय विभागाचे राष्ट्रवादी कार्याध्यक्ष रामभाऊ कांबळे, डॉ. भीमराव पवार, कल्याण अनपट सर, सौ कल्पना भोसले, विश्वजीत भोसले, रत्नदीप भोसले, संतोष शिंदे सर, अनिल अवताडे, समाधान पाटील, सोसायटी व्हॉइस चेअरमन कांतीलाल काळे, मनोहर केशव पवार, तानाजी मिस्किन, सचिन पवार, दिगंबर भोसले, अमोल पवार, अक्षय रोमन, नवनाथ निर्धार, विष्णुपंत काळे, बिभीषण हुलगे, रावसाहेब हुलगे, नामदेव कांबळे, बाळासाहेब काळे, किशोर कदम, माजी सरपंच श्रीमंत माने, भारत माळवतकर, संभाजी चोरमल, बापू काळे, तुकाराम वाघमोडे, दत्तात्रय कोकाटे, अनिल धोत्रे, अमोल ताकतोडे, पप्पू काळे, बबलू काळे, मदन शिरसागर, रामराजे हुंबे, सागर हुंबे, विश्वजीत हुंबे, बबलू हुंबे, सुरज हुंबे, हरिदास बापू अनपट, दत्तात्रय आटकळे, रवींद्र भोसले, गणेश हुंबे, तसेच बेंबळे गटाचे ग्रीओरशिअर मोरे साहेब व सर्व स्टाफ बेंबळे ग्रामस्थांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.



