ब्रेकिंग
मांडले धबधबा येथे दोन कॉलेज तरुणांचा बुडून मृत्यू
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड : महाड तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या मांडले धबधबावर दोन कॉलेज तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
31 ऑगस्ट रोजी मांडले धबधबावर कॉलेज तरुण फिरण्यासाठी आले असता त्यामधील दोन तरुणांचा बुडून
मृत्यू झाला, हे तरुण हिरकणी वाडी येथील रहवाशी असून सचिन अवकीरकर आणि रोहित अवकीरकर असे या तरुणांची नावे आहेत.
त्यांचा मृतदेह महाड येथील सरकारी रुग्णालय येथे नेले असून त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.



