तालुका
शिवसेना व युवासेना प्रमुख पदाधिकारी यांचा मार्गदर्शन मेळावा शिवनेरी निवासस्थानी संपन्न
आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मार्दर्शनाखाली मेळावा संपन्न
मिलिंद पवार – ग्रामीण प्रतिनिधी महाड
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका काही दिवसातच येत आहेत, या निवडणुकी पूर्वी सर्व पक्ष आपआपली पक्षबांधणी करीतआहेत, यासाठी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शिवनेरी या निवासस्थानी शिवसेना व युवासेना प्रमुख पदाधिकारी यांचा मेळावा संपन्न झाला.

यावेळी दक्षिण रायगड जिल्हा युवासेना अधिकारी विकास गोगावले यांनी सर्व पदाधिकारी यांना योग्य असे मार्गदर्शन करून आपणमहिला संघटक, युवा सेना, शिवसेना पदाधिकारी यांची मोर्चे बांधणी लवकरात लवकर सुरुवात करणार असल्याचे सांगितले.

यावेळी दक्षिण रायगड जिल्हा युवासेना अधिकारी विकास गोगावले, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुका प्रमुख, सर्व जिल्हा परिषद सदस्य, सर्व पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती आजी माजी सभापती व इतर अनेक पदाधिकारी या उपस्थित होते.



