भावे पठार भेलोशी वाडी काँग्रेस मधील ग्रामस्थ शिवसेनेत दाखल
रायगड जिल्हा युवा अधिकारी विकास गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश
अभिजीत ढाणीपकर – ग्रामीण प्रतिनिधी महाड
महाड तालुका वरंध विभागातील भावे पठार येथील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी रायगड जिल्हा युवा अधिकारी विकास गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
प्रवेश करण्याचे कारण अनेक वर्ष काँग्रेसच्या पाठीशी राहून देखील कोणत्याही प्रकारची विकास कामे न झाल्यामुळे आणि आमदार भरतशेठ गोगावले साहेबांनी आम्ही दुसऱ्या पक्षात असताना देखील काम सांगितल्या बरोबर ताबडतोब कामांना सुरुवात देखील केली, आम्ही कोणत्या पक्षात आहोत याचा विचार भेदभाव न करता आमच्या गावातील कामाचा शुभारंभ देखिल करण्यात आला त्यामुळे आम्ही शिवसेनेत प्रवेश करत आहोत असे प्रवेशकर्त्यांनी सांगितले.
प्रवेश कर्त्यांना मार्गदर्शनात सांगितले की आमच्याकडे येणारा व्यक्ती कोणत्या पक्षात आहे, याचा विचार आम्ही करत नाही आम्ही या ठिकाणी राहणाऱ्या माझ्या जनतेचा ग्रामस्थ व महिला भगिनींचा विचार करतो, आपण शिवसेनेत आला नसतात तरी देखील आम्ही तुमची विकास कामे केलीच असती परंतु तुम्ही जर आमच्याकडे येऊन आम्हाला सांगितलेच नाही आणि तुमची अडचण मांडलीच नाही तर आम्हाला कसे समजणार, व्यथा आमच्यापर्यंत येऊन मांडल्या नाहीतर आम्हाला तरी कसे समजणार, प्रवेश कर्ते गणेश भेलोशे, रामचंद्र भेलोशे, संदीप बेलोसे, निर्मला भेलोसे, मंदा बेलोसे, लक्ष्मण भोसले, रामचंद्र भोसले, प्रकाश भोसले, गणपत भोसले, प्रमिला भोसले, सरस्वती भोसले, सुशीला भोसले, अर्चना भोसले, मारुती भेलोसे, सुभाष पवार, सोनल पवार, सरिता भेलोसे, हरिचंद्र भेलोसे, पुष्पा भेलोसे, राजेंद्र भेलोसे, जितेंद्र भेलोसे, सुगंधा भेलोसे, बळीराम भेलोसे, सुरेखा भेलोसे, विशाल भेलोसे, तुषार भेलोसे, वैशाली कलाबाई, भेलोसे प्रमोद, पुनम भेलोसे, कल्पना भेलोसे, मंगेश भेलोसे ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी शिवनेरी या निवासस्थानी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या प्रवेश समारंभावेळी विभागातील विभाग प्रमुख लक्ष्मण भोसले, गोपीनाथ सावत, शाखाप्रमुख प्रकाश गायकवाड, उपशाखाप्रमुख विकास यादव, युवा सेना अधिकारी प्रताप मस्के, भावे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच आशा अंकुश जाधव, शिवसैनिक राजू जाधव, चंद्रकांत मालुसरे, गुणाजी मोरे, शिवसैनिक, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत प्रवेश संपन्न झाला.



