तालुका

जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या सूचनेनुसार खालापूर तहसिलदार कार्यालयात कोविड-19 कॉल सेंटर सुरू

खालापूर तालुक्यातील नागरिक 02192-275001 या दूरध्वनीवर संपर्क साधून मिळवू शकतात कोविड संबंधी मदत व मार्गदर्शन

प्रतीक पलंगे – जिल्हा प्रतिनिधी रायगड

सद्य:परिस्थितीमध्ये करोनाचा प्रादूर्भाव सर्वत्र वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यात तातडीनेउपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी सर्व तहसील कार्यालयांमध्ये कोविड-19 कॉल सेंटर सुरूकरण्याच्या कालच सर्व तहसिलदारांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार खालापूर तहसिलदार कार्यालय येथे कोविड-19 कॉल सेंटर सुरूकरण्यात आले आहे. 02192-275001 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून नागरिक कोविड-19, बेड व्यवस्थापन, ॲम्बुलन्स तसेचअन्य वैद्यकीय सुविधा याबाबतची माहिती विचारू शकतात, वैद्यकीय मदत व मार्गदर्शन मिळवू शकतात, अशी माहिती खालापूरतहसिलदार श्री. आयुब तांबोळी यांनी दिली आहे. 

नागरिकांनी घाबरून न जाता  लसीकरण करून घ्यावे, मास्क वापरावा, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, सॅनिटायजरचा वापर करावा, हात वारंवार स्वच्छ धुवावेत, कोविड अनुरूप वर्तनाचे काटेकोर पालन करावे, कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास तात्काळवैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व खालापूर तहसिलदार आयुब तांबोळी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!