तालुका

महाड औद्योगिक वसाहत येथील नवीन प्रकल्पाचे उद्घाटन आदरणीय खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते

 

स्वप्नील ढवण – उपसंपादक

रायगड जिल्ह्यातील महाड येथे ॲस्ट्रिड लाईफ सायन्सेस प्रा. लि. कंपनीच्या महाड औद्योगिक वसाहत येथील नवीन प्रकल्पाचे उद्घाटन आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी आदरणीय खासदार सुनिलजी तटकरे साहेब, पालक मंत्री आदितीताई तटकरे आणि आमदार भरतशेठ गोगावले उपस्थित होते.

पर्यावरणपूरक धोरण असल्याने रायगड जिल्ह्यातील औद्योगिक विकास विस्तारत आहे. या नवीन प्रकल्पामुळे येथील नागरीकांना रोजगाराची संधी देखील उपलब्ध होणार आहे. उद्योजकांच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. या प्रसंगीकंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रविंद्रजी जगताप, संचालिका सौ. अनुपमा जगताप, कंपनी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!