महाराष्ट्र

इंडिया टुडे वृत्तसमूहाच्या वतीने कॉनक्लेव्ह कार्यक्रम आयोजित करण्यात आला

 

अभिजीत ढाणिपकर –उपसंपादक कोकण विभाग

इंडिया टुडे वृत्तसमूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कॉनक्लेव्ह कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभागी होऊन राज्यात घडलेल्या सत्तांतरासहित प्रस्तावित विकासकामांबाबत आपले विचार मांडले.

युती सरकार हे जनसामान्यांचे सरकार असून लोकाभिमुख निर्णय घेणारे सरकार असल्याचे याप्रसंगी स्पष्ट केले. गेल्या तीन महिन्यांत राज्यातील शेतकरी, कष्टकरी जनतेला न्याय देणाऱ्या अनेक निर्णयांची माहिती या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी बोलताना दिली.

राज्यात युती सरकार सत्तेत येताच पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी केले, शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट मदत दिली, राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या वेगवेगळ्या प्रकल्पांना गती दिली. लवकरच राज्यभरात ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात येणार असल्याचेदेखील याप्रसंगी त्यांनी नमूद केले.

राज्यातील युती सरकार हे केंद्र सरकारच्या सहकार्याने अतिशय भक्कमपणे पुढील वाटचाल करत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्रितपणे या राज्याला नवीन उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. लोकांच्या हितासाठीच आम्ही आरे मध्येच मेट्रो कारशेड करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही यावेळी त्यांनी अधोरेखित केले.

याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, पायाभूत सुविधा प्रकल्पांचा वॉर रुमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार, इंडीया टुडे ग्रुपचे अध्यक्ष अरुण पुरी, अभिनेता अभिषेक बच्चन, इंडिया टुडे ग्रुपचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई, आज तक वृत्तवाहिनीचे मुंबई ब्युरो चीफ साहिल जोशी, राजकीय पत्रकार कमलेश सुतार, समन्वयक आशिष कुलकर्णी, भाजप प्रवक्त्या शायना एन.सी. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि इंडिया टुडे वृत्तसमूहातील पत्रकार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!