तालुका
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 96 वी जयंती साजरी
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 96 वी जयंती असून यानिमित्त मुंबईसह राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन केल
प्रतीक पलंगे – जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड तालुक्यामधून महाड शहर व कुंभार आळी शिवसेना शाखे तर्फे जयंती उत्सवात साजरी करण्यात आली, कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी यांनी शिवसेना पक्षाच्या जडण – घडणी मध्ये दिलेल्या योगदानाबद्दल शहरातील ज्येष्ठ शिवसैनिकांची सदिच्छ भेट घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले. तसेच गोर गरिबांना फळे वाटप करण्यात आली.

या वेळी उपजिल्हा प्रमुख पद्माकर मोरे, तालुका संपर्क प्रमुख बंधू तरडे, महाड शहर संपर्क प्रमुख नानू तांबट, महाड शहर प्रमुख नितिनपावले, महिला आघाडी प्रमुख विजयालक्ष्मी पोटसुरे, युवासेना शहर अधिकारी सिद्धेश पाटेकर, उपशहर प्रमुख, नगरसेवक चेतन पोटपोडे, प्रवीण अग्रवाल, योगेश रातवडकर, सागर घोलप, सुदेश पाटील व कुंभार आळी चे शाखा प्रमुख प्रतिक पलंगे, कार्यकर्ते वपदाधिकारी उपस्थित होते.



