ब्रेकिंग

गोल्डमॅन पंढरीशेठ फडके यांचं अल्पशा आजाराने निधन

 

भरत पवार – शहर प्रतिनिधी नालासोपारा 

पनवेल : गोल्डन मॅन पंढरीशेठ फडके यांचं निधन झालं आहे, पंढरीशेठ यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. पंढरीशेठ यांच्या निधनाने पनवेलच्या विहिगर येथील परिसरात शोकाकूल वातावरण आहे. पंढरीशेठ यांच्या जाण्याने बैलगाडा शर्यत प्रेमींना मोठा धक्का बसला आहे.

मुळचे पनवेलचे असलेले पंढरीशेठ फडके हे बैलगाडा शर्यत शौकिन म्हणून ओळखले जातात. पंढरीनाथ फडके हे आधी शेकाप पक्षात सक्रिय होते. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 1986 सालापासून वडिलांमुळे फडकेंना बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली.

बैलगाडा शर्यतीच्या मैदानात त्यांच्या हटके एन्ट्रीची, सोन्याची आणि गाडीच्या टपावर बसून शर्यत बघण्याच्या निराळ्या स्टाईलची चांगलीच चर्चा असायची. बैल नजरेत बसला की कितीही पैसे लागू द्या, त्याला विकत घेणारा ‘बैल’ मालक म्हणून पंढरीशेठ यांची ओळख होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!