तालुका

मा. सरपंच राजेंद्र खातू, महेश बेंदुगडे आणि कार्यकर्ते यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

पाचाड येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

महाड : स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी वसलेल्या पाचाड गावात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का, मा. सरपंच राजेंद्र खातू, महेश बेंदुगडे आणि कार्यकर्ते यांनी शिवसेनेत आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश केला.

पाचाड गावच्या विद्यमान सरपंच यांचे पती महेश बेंदुगडे यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे, त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी यांनी देखील शिवसेना प्रवेश केला.

आमदार भरतशेट गोगावले यांचा मनमिळाऊ स्वभाव आणि विकासकामांचा धडका पाहुन शिवसेना पक्षात प्रवेश – मा. सरपंच राजेंद्र खातु.

पाचाड येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.

या वेळी आमदार भरतशेठ गोगावले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजय आप्पा सावंत, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश महाडिक, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे, संपर्क प्रमुख बंडू तरडे, डॉ. प्रकाश खेडेकर, संजय शिंदे, विभाग प्रमुख लहू अवकिरकर, उपसरपंच गणेश अवकिरकर, उपतालुका प्रमुख संतोष गायकवाड, प्रभाकर सावंत, सचिन मोरे, उपतालुका प्रमुख प्रभाकर मोरे, जयेश लामजे, गायकवाड तसेच या भागातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!