तालुका
गांगवली सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ महिला यांचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश
गांगवली येथील २ कोटी ६१ लक्ष रुपये खर्च करून पूर्ण केलेल्या पुलाचा लोकार्पण सोहळा आमदार भरतशेठ गोगावले संपन्न
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
माणगाव : माणगाव तालुक्यातील गांगवली येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत मधील सर्व सदस्य, ग्रामस्थ आणि महिला मंडळ यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थित शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.
आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत अनेक गावातील सरपंचासह कार्यकर्ते दररोज पक्ष प्रवेश करत आहेत,
अनेक गावातील विकास कामे पाहून गांगवली ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि कार्यकर्ते यांनी प्रवेश केला.
या वेळी माणगाव तालुक्यातील आणि निजामपूर विभागातील शिवसेना युवा सेनेचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते.
गांगवली येथील २ कोटी ६१ लक्ष रुपये खर्च करून पूर्ण केलेल्या पुलाचा लोकार्पण सोहळा आमदार भरतशेठ गोगावले संपन्न



