तालुका

अंबर्ले वडाचा कोंड येथील सभामंडपाचे लोकार्पण तसेच रस्त्याचे भूमिपूजन

स्वप्नील ढवण - उपसंपादक

आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नाने माणगाव तालुका मधील लोणेरे विभागातील अंबर्ले वडाचा कोंड येथील हनुमान मंदिरसमोरील सभामंडपाचे उद्घाटन तसेच रस्त्याचे भूमिपूजन आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या वेळी माजी जिल्हा प्रमुख प्रमोद शेठ घोसाळकर, तालुका प्रमुख गजानन अधिकारी, माणगाव पंचायत समिती उपसभापती सुजित शिंदे, पंचायत समिती सदस्य महेंद्र तेडगुरे, उपतालुका प्रमुख पंढरी शेडगे, विभाग प्रमुख व लोणेरे सरपंच रवी टेंबे, मा पंचायत समितीसदस्य भाऊसाहेब करकरे, सरपंच रोहिणी उभारे, उद्योजक सिताराम उभारे, प्रकाश टेंबे, तसेच या कार्यक्रमासाठी या विभागातील शिवसेना युवा सेनेचे आजी–माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी ग्रामस्थ इत्यादी उपस्थित होते.

यावेळी आमदार गोगावले यांनी सांगितले की खूप दिवसापासून आपल्या रस्त्याची मागणी होती ती आता लवकरच पूर्ण करत आहोततसेच या ठिकाणी ज्या कामांना विलंब झाला आहे ती कामे देखील लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे, कोणी कितीहीपत्र देऊ द्या नाहीतर काही करू द्या ते फक्त खोटी आश्वासने देणार आहेत, या विभागात कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू आहेत तसेच जल जीवन मिशन अंतर्गत माननीय मंत्री गुलाबरावजी पाटील यांनी कोट्यावधी रुपये, पाणी योजनासाठी या मतदारसंघा करिता दिलेले आहे, या भागातील विकास कामे फक्त शिवसेनेच्याच माध्यमातून झालेली आहेत आणि उर्वरीत कामे होणार देखील आहेत काहीकामे प्रगती पथावर आहेत आणि काही कामांचा शासकीय पाठपुरावा सुरू आहे असे गोगावले यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!