महाड उत्पादक संघटना संस्कृतिक विभागा तर्फे रास दांडिया 2022 चे आयोजन
सचिन चांदोरकर – उपशहर प्रतिनिधी महाड
महाड : महाड उत्पादक संघटनेच्या सांस्कृतिक विभागा तर्फे रास दांडीया 2022 या उपक्रमाचे आयोजन 1 ते 4 ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले आहे. या कालावधीत दररोज सायंकाळी 7 ते 10 या वेळात रास दांडिया बरोबरच विविध सांस्कृतिक स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे.
महाड औद्योगिक वसाहती मधील एमएमए मेैदानावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवा दरम्यान, शनिवार दि. 1 ऑक्टोबर रोजी परफेक्ट मॅचिंग, रविवार दि. 2 ऑक्टोबर रोजी पारंपारिक वेशभूषा, सोमवार दि. 3 ऑक्टोबर रेाजी बॉलीवूड थीम आणि आठवणीतील पात्र, तर 4 ऑक्टोबर रेाजी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व वयोगटांसाठी या स्पर्धा खुल्या असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. स्पर्धेतील विजेत्यांना 4 ऑक्टोबर रेाजी सन्मानित करण्यात येणार आहे.
या उपक्रमाबरोबर 2 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत दान उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत गरजुंना वस्तु, कपडे, खेळणी यासारख्या उपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात येते. नागरिकांनी या वस्तु आयोजकांकडे सुपूर्द केल्यानंतर, त्यांची वर्गवारी करुन, त्या वस्तु गरजुंना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.



