रायगड जिल्हा स्थरीय महिला कबड्डी पालकमंत्री चषक स्पर्धेचे आयोजन
संजय पाटील - तालुका प्रतिनिधी रोहा
खासदर सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष यांच्या सयुक्त विद्यमानाने अद्वितीय आदिती या उपक्रमाअंतर्गत रायगड जिल्हा स्थरीय महिला कबड्डी पालकमंत्री चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेप्रसंगी खासदर सुनीलजी तटकरे, सौ. वरदा तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, कबड्डी असोशियन जिल्हा अध्यक्ष आस्वाद पाटील, रा.काँ.पा. कार्याध्यक्ष मधुकर पाटील, जिल्हाध्यक्षा गीता पालरेचा, रा.कॉं. जिल्हा युवक अध्यक्षअंकित साखरे, सुरेश महाबळे, अस्मिता भोरावकर, भाई टक्के, शिवराम शिंदे, महेंद्र पोटफोडे, मनोज शिर्के, श्रीकांत चव्हाण, तालुक्यातील सर्व जेष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते कबड्डी रसिक आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये १६ नामाकींत संघांनी सहभागी होऊन स्पर्धेस रोमांचक करून सर्वच प्रेक्षकांना हम भी किसी हे कम नही महिला सुद्धा आता सर्वच क्षेत्रात अव्वल आहे अस दाखवुन दिल. या निमित्ताने कबड्डी या खेळातुन आपली ओळख निर्माण करून मेहनतीच्या जोरावर अर्जुन पुरस्कार तसेच शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केले गेलेल्या व्यक्तिमत्व शकुंतला ताई खटावकर, मिस्टर वल्ड बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप गोल्ड मेडलिस्ट रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील खेळाडू सागर कातुर्डे व डॉ. प्रशांत मटकर यांनी आरोग्य क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल, रोहा तालुक्यातील कोलाड येथील महेश सानप यांच्या सहकार्यांनी महा महापुर, सावित्री पुल दुर्घटना येथे केलेले मदत कार्य अश्या चार सत्कार मुर्तिंचा विशेष सत्कार करण्यात आला.




