जिल्हा

माणगाव तालुका भाजपा युवामोर्चा अध्यक्षपदी परेश सांगले यांची निवड

 

सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक

माणगाव : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा माणगाव तालुका अध्यक्ष पदी दि. ०३ डिसेंबर रोजी पानसई गावचे सुपुत्र व युवा उद्योजक परेश सुरेश सांगले यांची निवड युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेशजी थोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

परेश सांगले यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करताच माणगाव तालुक्यातील तरुणांना संघटित करत तरुणांची फळी पक्षामागे उभी करण्याची सुरुवात केली, माणगाव तालुक्यात झालेल्या विभाजन विभीषीका स्मृती दिवस निमित्त निघालेल्या रॅली मध्ये त्याचप्रमाणे सामना वृत्तपत्राविरोधात माणगाव मध्ये झालेल्या युवा मोर्चाच्या आंदोलनामध्ये शेकडो तरुणांना त्यांनी सहभागी करून घेतले, पानसई सारख्या ग्रामीण गावातून असल्यामुळे त्यांचा ग्रामीण भागातील तरुणांशी अतिशय चांगला संपर्क आहे. तालुक्यातील विविध क्रीडास्पर्धा, मैदानी खेळ यामध्ये त्यांचा तरुणांशी दांडगा संपर्क आला आहे. पक्षकार्यासाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता समर्पित भावाने कार्य करण्याची त्यांची क्षमता पाहूनच वरिष्ठानी त्यांची नियुक्ती केलेली आहे. या दरम्यान परेश सांगले यांची युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल तालुक्यातील सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुलभैय्या लोणीकर, लोकसभा प्रमुख सतीशजी धारप, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा पाटील यांना अभिप्रेत असणारे कार्य त्यांच्या हातून घडेल अशी अपेक्षा भाजपा युवानेते निलेश थोरे यांनी यावेळी व्यक्त केली.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!